Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

बल्लारपुरात बर्निंग कारचा थरार.... #Fire


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रपुढे पार्क केलेली मारूती ब्रेजा गाडी पेटली. कारमधील व्यक्ती वैयक्तिक कामामुळं रुग्णालयात गेल्यानं जीवितहानी टळली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत गाडीचं मोठं नुकसान झालं होतं.
आगीचं कारण अस्पष्ट....

ब्रेझा कार मधील व्यक्ती नजीकच्या दवाखान्यात गेली होती. तितक्यात गाडीला आग लागली आणि बघता बघता आगीन रौद्र रुप धारण केलं. बल्लारपूर नगरपालिकेच्या अग्निशामन पथकाने सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलानं तातडीने कारवाई करत आग विझवली. मात्र, तोपर्यंत गाडीची मोठी हानी झाली होती. चार चाकी गाडीला आग का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
बल्लारपूरात बर्निंग कारचा थरार....

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरात बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेपुढे पार्क केलेली मारूती ब्रेजा गाडी पेटली. कार मधील व्यक्ती नजीकच्या दवाखान्यात गेल्याने जीवितहानी झालेली नाही. बल्लारपूर नगरपालिकेच्या अग्निशामन पथकाने सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
ही कार गिरीश नावाच्या व्यक्तीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलासंह तो दवाखान्यात गेला होता. दवाखान्यातून परत आल्यावर पाहिलं असता कारला आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. कारला आग लागलेल्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी गर्दी कमी करण्याचं आवाहन केलं होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत