अपघातात दोघांचा मृत्यू
चंद्रपूर:- चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटाचौकी जवळ मंगळवारी रात्रीच्या सुमारास चारचाकी व दुचाकी वाहनात भीषण अपघात झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. भीमराव तोडास, सलीम शेख असे मृतकांचे नाव आहेत.
मंगळवारी रात्री जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता त्यावेळेला हा अपघात झाला असून दुचाकीस्वार हे विवाह समारंभातून चंद्रपुर हुन मूल कळे परत जात असताना चारचाकी वाहनाने दुचाकी ला जोरदार धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.