शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे अनुसुचित जाती तसेच जमाती प्रवर्गातील विद्यार्थीनींसाठी वसतीगृह इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा #Chandrapur

७ कोटी ८९ लक्ष ६० हजार रू. किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित


चंद्रपूर:- शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे अनुसुचित जाती तसेच जमाती प्रवर्गातील अभियांत्रीकीच्‍या विद्यार्थीनींसाठी ७ कोटी ८९ लक्ष ६० हजार रू. किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्‍याने केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे. राज्‍य शासनाच्‍या उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाने दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी या याबाबतचे शासन ज्ञापन निर्गमित केले आहे.

शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे अनुसुचित जाती तसेच जमाती प्रवर्गातील अभियांत्रीकीच्‍या विद्यार्थीनींसाठी वसतीगृह इमारत बांधकामाच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्‍यता न मिळाल्‍यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्‍या होत्‍या. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वित्‍त विभाग तसेच उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाच्‍या स्‍तरावर सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. त्‍यांच्‍या या पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे. शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथे अनुसुचित जाती तसेच जमाती प्रवर्गातील अभियांत्रीकीच्‍या विद्यार्थीनींसाठी इमारत बांधकामाचा मार्ग आ. मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी मोकळा झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत