Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

लॉजमध्ये 'प्राॅमिस डे' दिवशीच प्रेमी युगुलाची आत्महत्या #promiseday #suicide

गोंदिया:- गोंदिया शहरातील हॉटेल एव्हरग्रीन मध्ये काल रात्री एका प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असून सदर आत्महत्या कुठल्या कारणातून झाली याचा शोध गोंदिया ग्रामीण पोलिस घेत आहेत.
नागपुरातील 21 वर्षीय रोहिणी पवार व गोंदियातील 22 वर्षीय आकाश छेतीया हे दोघे जण काल या हॉटेलमध्ये मुक्कामी आले होते. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या मुलाने आपण हॉटेल एव्हरग्रीन मध्ये असल्याची माहिती आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला दिल्याने मृत युवकाच्या आईने एव्हरग्रीन हॉटेल गाठत वेटर च्या मदतीने रूम मध्ये जाऊन पहिले असता आकाश आणि रोहिणी हे दोन्ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत