निलकमल महिला ग्रामसंघाच्या वतीने आठवडी बाजाराचे उदघाटन सोहळा संपन्न #sindewahi

उमेद अभियानाचे उपजीविका कडे वाटचाल; ग्रामीण भागातील महिला बचत सक्षमीकरण
सिंदेवाही:- निलकमल महिला ग्रामसंघ पवनपार तालुका सिंदेवाही च्या वतीने आठवडी बाजार (रुलर हॅट) भरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उदघाटक सौ.मंदाताई बाळबुद्धे पंचायत समिती सभापती, कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. रूपाताई सुरपाम जि. प.सदस्य, प्रमुख अतिथी श्री. राहुल पोरेड्डीवार पंचायत समिती सदस्य, श्री. आळे ग्रामसेवक पवनपार, सौ. भारतीताई भेंडाळे ग्रा. पं. सदस्य. सौ. मनीषा बरसागडे ग्रा. पं. सदस्य, श्री. मनोज सुरुंदकर शा. व्य.समिती अध्यक्ष, सौ.भारती पोरेड्डीवार ग्रामसंघ अध्यक्ष, सौ. प्रियंका वाढई ग्रामसंघ सचिव, सौ. शीतल बांबोळे ग्रामसंघ कोषाध्यक्ष, व समूहातील महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक (उमेद) यांनी केले.
श्री.उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक (उमेद) ,श्री. संदिप उईके प्रभाग समनव्यक, श्री. ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समन्वयक,कु.सविता उईके प्रभाग समन्वयक, ग्राम पंचायत सदस्य , पोलीस पाटील, आशा वर्ककर, अंगणवाडी शेविका उपस्थित होते. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जितेंद्र पेंदाम यांनी केले. कार्यक्रम येशस्वितेकरिता सौ. जमुना सुरजागडे ,सौ. मीनाक्षी लोनबले, सौ. वेणूताई भेंडारे, सौ. माधुरी वाडगुरे,मयुर खोब्रागडे,प्रभाकर मानकर यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत