Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चंद्रपूर जिल्हा बँकेतील कॉंग्रेस विरुद्ध कॉंग्रेस वादात अमित शाहांची एंट्री #chandrapur

सीबीआय चौकशी लावणार
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर (चंद्रपूर) यांना दिले.
काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांनी या बँकेतील गैरव्यवहाराबद्दल लोकसभेत लक्ष वेधले होते. या बँकेच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे नेते व राज्यातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे वर्चस्व आहे. गेल्या काही वर्षांपासून या बँकेतील गैरव्यवहार गाजत आहे. पदभरती व खासगी बँकांमध्ये बँकेतील ठेव गुंतविण्याचे प्रकरण उपस्थित करीत बँकेवर प्रशासक असतानाही संचालक मंडळ बेकायदेशीरपणे काम करीत असल्याचा आरोप धानोरकर यांनी यावेळी केला.
या मागणीची दखल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. खासदार धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत