Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

ट्रकने कामगारांना उडविले; एकाचा मृत्यू, एक गंभीर #death #accident

कोरपना:- अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत दोन कामगार मंगळवारी सकाळी ८ वाजता दुचाकीने कंपनीत जात असताना राजुरा मार्गावरील सना पेट्रोलपंपासमोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक टीएस ०१ यूसी ०२२५)ने त्यांना जबर धडक बसली.
यात दुचाकीस्वार भाऊराव डाखोरे (४७) रा. गडचांदूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संतोष पवार (३७) हा गंभीर जखमी झाला. जखमीला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाला.
गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत