Top News

सिंदेवाही तालुक्यात शेतकरी कार्यशाळा #sindewahi


सिंदेवाही:- वासेरा येथे प्रसन्न पाटील बोरकर यांच्या शेतात कृषी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यात उपस्थित तालुका कृषी अधिकारी, सिंदेवाही यांच्यामार्फत रा.अ .सु .अ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य (ज्वारी) पिकावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी डॉ.वि.जी. नागदेवते ,कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही. श्री ए.आर.महाले . तालुका कृषी अधिकारी .सिंदेवाही, श्रीमती शीलाताई कन्नाके मा.उपसभापती पंचायत समिती सिंदेवाही,श्री महेश बोरकर,सरपंच वासेरा,श्री नरेंद्र वाघमारे ग्रामसेवक ,श्री महेंद्र सूर्यवंशी व नागेश मेडीवार कृषी मित्र दिनकर बोरकर पोलीस पाटील तलांडे मान्यवर यांच्या हस्तें कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले तालुका कृषी अधिकारी यांनी कृषि विभागाच्या योजना तसेच विनोद नागदेवते यांनी ज्वारी पिकाची लागवड. किडीची ओळख रोगाची ओळख कीड व रोग व्यवस्थापन . फवारणी करताना घ्यावयाची काळाजी . ज्वारी पिकावरील फवारणी साठी शिफारशीत कीटकनाशके व बुरशीनाशके या विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन जी .एस .कोल्हापुरे कृषी सहायक यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप व्ही एस निकम कृषी सहायक यांनी केले गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना ज्वारी पिकाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने