💻

💻

लोकनेत आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनी स्तुत्य उपक्रम.


*गोटूल स्थापनेसाठी सचिन डोहे यांच्या पुढाकारातून आर्थिक मदत व वृक्षारोपण कार्यक्रम*


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा, दि. 30 जुलै : आठवडी बाजार वार्डातील सार्वजनीक विहीर परिसरात आदिवासी समाजबांधवाकडून आदिवासी जमातीचे प्रतिक गोटूल चिन्हाचे बांधकाम करण्यात येत आहे. या गोटूल बांधकामासाठी जिल्ह्याचे लोकनेते, माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पुढाकारातून आर्थिक मदत करून प्रस्तावीत गोटूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.


याप्रसंगी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांकडून समाजबांधवाकडे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. प्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्रजी डोहे, आदिवासी नेते आनंदपाटील सिडाम, शंकर कुळसंगे, बापुराव कन्नाके, आदिवासी युवा नेते रवी आत्राम, भाजपा तालुका उपाध्यक्ष सिनु पांजा, युवा नेते प्रदिप मोरे, योगेश येरणे, अक्षय तुराणकर, छबीलाल नाईक, नरेश सोयाम, मनोज कन्नाके, रवी सोयाम, लक्ष्मण कुळसंगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.


    आदिवासी समाज हा मेहनती व अत्यंत विश्वासू असा समाजाचा कणा आहे. देशाच्या स्वातंत्र्यात या समाजाचा मोठा वाटा असून वनाच्या रक्षाणासह जुन्या रूढी पंरपरा जपून ठेवण्यात हा समाज आग्रही आहे. आदिवासी बांधवांच्या हितासाठी भारतीय जनता पक्ष सदैव कटीबध्द असून त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यास आम्ही तत्पर असल्याचे मत भाजयुमो जिल्हा उपध्यक्ष सचिन डोहे यांनी प्रसंगी व्यक्त केले.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश मेश्राम, उमेश आत्राम, विक्की मडावी, विशाल मडावी, करण सिडाम, विशाल टेकाम, अक्षय कुळसंगे, संतोष उईके आदींस भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते तथा आदीवासी समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत