Click Here...👇👇👇

आगीत घरे जळालेल्या ठाकूर कुटुंबाला शासनाकडून मदत #chandrapur #gondpipari

Bhairav Diwase
सौ. कोमल फरकाडे यांनी केला होता आ. सुधीर मुनगंटीवारांकडे पाठपुरावा 
गोंडपिपरी:- तालुक्यातील चेकलिखीतवाड्यात शॉर्ट शर्किट मुळे आग लागल्याची घटना दि. २ मे सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली घडली होती. चेकलिखीतवाडा येथील बाबुराव ठाकूर, सुभाष बाबुराव ठाकूर, अमित बाबुराव ठाकूर तीन कुटुंबियांचे पूर्ण घर आगीत जळून खाक झाले. 
या घटनेची तात्काळ दखल घेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याच सांत्वन म्हणून आमदार श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना गावातील भाजपचे सक्रिय सदस्या सौ. कोमल ताई फरकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा जिल्हा महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा कु. अल्का ताई आत्राम यांच्या हस्ते ठाकूर कुटूंबियांना मदत देण्यात आली.
सौ. कोमल फरकाडे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे पाठपुरावा करून शासनाकडून दि. ०१ जुलै ला बाबुराव ठाकूर, सुभाष ठाकूर, अमित ठाकूर यांना गोंडपिपरी तहसीलदार मेश्राम यांच्या हस्ते शासकिय मदत देण्यात आली.
यावेळी तलाठी उईके, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष ॲड. सौ. अरुणा जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. कोमल फरकाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर कोहपरे, पोलीस पाटील वंदनाताई रामटेके उपस्थित होत्या. बाबुरावजी ठाकूर, सुभाष ठाकूर, अमित ठाकूर यांनी आ. सुधीर भाऊंचे आभार मानले.