चांद्यापासून बांद्यापर्यंत, आ. सुधीर मुनगंटीवार म्हणतात देवेंद्र फडणवीसांच मन विशाल #chandrapur
देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाची शिदोरी....यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या अनुभवाची शिदोरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी रहावी, त्यांना त्यांचे अनुभव देण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवाची आणि त्यांच्या नेतृत्वाचा फायदा एकनाथ शिंदे यांनाही व्हावा त्यामुळेही पक्षाकडून त्यांच्यावर जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत.....तसेच चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या असणाऱ्या जनतेची आणि एकूण महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी तुमच्या अनुभवाची शिदोरी, तो अनुभव त्यांच्या पाठीशी उभा करावा म्हणून त्यांना हे नेतृत्व दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी.....भाजपचा कार्यकर्ता हा सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी काम करतो, त्यामुळे या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस नाराज नसल्याचे सांगितले. तसेच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा देशासाठी का करत आहे असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाच्या या निर्णयामुळे ते नाराज नसून देवेंद्र फडणवीसांचे मन विशाल आहे असंही त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांना अनुभवाचा फायदा....पक्षाने दिलेल्या या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस हे नाराज नसून त्यांच्या अनुभवाचा फायदा एकनाथ शिंदे यांना नक्कीच होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या या निर्णयामुळे ते नाराज नसून महाराष्ट्राच्या राजकीय प्रगतीचा हा मास्टरस्ट्रोक आहे असंही त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत