Top News

तीव्र आंदोलन व घागर मोर्चा काढण्याचा इशारा #chandrapur #gondpipari

2 दिवसांत पाणी पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन छेडणार:- चेतनसिंह गौर
गोंडपिपरी:- गोंडपिपरी शहरात 15 ते 20 दिवसांपासून सतत पाणी पुरवठा ठप्प होत आहे. नगर पंचायत कासव गतीने काम करत आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांचे हाल होत आहे. येत्या 2 दिवसात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास गोंडपीपरी शहरातील सर्व महिला घेऊन भारतीय जनता पक्षा गोंडपिपरी तर्फे नागरिक व भाजप सर्व नगरसेवक, नगर सेविका तीव्र आंदोलन तथा घागर मोर्चा काढणार असल्याची माहिती भाजपा नेत्यांनी दिली. नगरपंचायत येथे प्रभागातील महिलांनी भेट दिली असता अध्यक्ष च्या अनुपस्थित असल्याने  पाणी पुरवठा सभापती यांची भेट घेऊन त्यांना परत जावे लागले.
यावेळी गटनेता तथा नगरसेवक चेतनसिंह गौर , नगर सेविका मनीषा मडावी, नगर सेविका सौ. मनीषा दुर्योधन, नगर सेविका सौ. अश्विनी तोडासे, व तसेच भाजयुमो शहर अध्यक्ष  प्रशांत येल्लेवार, प्रभागातील महिला व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने