शाळकरी मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील घटनेत दहा वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा खोटा बनाव रचला. विशेष बाब म्हणजे हा बनाव रचण्याची कल्पना त्याला टीव्ही शोमधून सुचली.
टीव्हीवरचे क्राईम शो पाहून या मुलाने स्वतःच्या अपहरणाची कथा तयार केली. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा हा बनाव पोलिसांनाही लवकर समजला नाही. पोलिसांनी सर्व महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र, तरीही काहीच सुगावा लागला नाही.
चंद्रपूर शहरालगतच्या पडोली येथे घडलेल्या या घटनेने पोलीस आणि पालक सगळेच बुचकळ्यात पडले. मुलाचं अपहरण नक्की कोणी आणि का केलं होतं? असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र, अखेर पोलिसांनी या मुलाला विश्वासात घेऊन त्याच्याकडूनच याबद्दलची माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी चौकशीत मुलाने जो खुलासा केला, तो सर्वांनाच हादरवणारा होता. या मुलाने आपण स्वतःच अपहरणाचा बनाव रचला असल्याचं पोलिसांसमोर मान्य केलं. इतकंच नाही तर हा बनाव रचण्यामागचं कारण आणखीच थक्क करणारं होतं. हा मुलगा घरून शाळेत जाण्यासाठी निघाला मात्र तो शाळेत गेलाच नाही. अशात शाळेत गैरहजर राहिल्याने पालक रागवतील म्हणून त्याने हा सगळा बनाव रचला होता. चंद्रपुरातील या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)