Top News

केंद्र व राज्यशासन पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांची माहिती आमंत्रित #chandrapur

चंद्रपूर:- क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योन्मुख तसेच नावलौकिक केलेल्या खेळाडूंकरीता आयुक्त क्रीडा व युवक सेवा, पुणे यांच्याकडून क्रीडा क्षेत्रातून विशेष संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनात प्राप्त केलेले पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय खेळाडू व त्यांनी केलेली कामगिरी संपूर्ण माहितीसह व एन.आय.एस क्रीडा मार्गदर्शक यांनी महाराष्ट्र राज्य व देशासाठी केलेले कार्य याबाबतची माहिती, खेळ प्रकार, क्रीडा कामगिरी, क्रीडा मार्गदर्शकांची पात्रता, घडविलेल्या खेळाडूंची यादी त्यांचा क्रीडास्तर याबाबतची सर्व माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने