Top News

राजुरा तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश #Rajura


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा 
राजुरा:- आगामी ग्रामपंचायत निवडणुक होऊ घातली आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी राजुरा तर्फे प्रत्येक गावांना भेटी देणे सुरू आहे. अहेरी, भेदोडा, आणि वरुर रोड येथे गावांना भेटी दिल्या व गावातील नागरिकांशी चर्चा केली,
पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कार्यप्रणाली वर भारतीय जनता पक्षाच्या ध्यायधोरणावर विश्वास ठेवत माजी आमदार अँड. संजय भाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजयुमो जिल्हा सचिव दिलीप गिरसावळे, पराग दातरकर यांच्या यांच्या उपस्थितीत वरुर रोड येथील अशोक आत्राम,विलास वडस्कर,मोरेश्वर धानोरकर,अनिल जपलवार, संतोष झाडे,मारोती जिवतोडे, भाऊजी जिवतोडे, रोशन मासिरकर,प्रवीण रणदिवे, सुरेश टेकाम, विजय मडावी,रवि आत्राम,अमोल गेडाम,विशाल गेडाम,प्रथम वसाके, दामोदर वडस्कर, केतन वसाके,गोपी बोरकुटे,मंगेश बोबडे,खंडू वडस्कर, विजय सुरतेकर,दिलीप मंगर,मोहन उपलडवार, सुरेश उपलडवार,गणराज काळे, कार्तिक धोबे,शुभम आदे,महेश लांडे,नितीन कोडापे,विकास कोडापे, यासह अनेक कॉग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाचा दुपट्टा टाकून त्याचे स्वागत केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा राजुरा तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत वर झेंडा फडकविण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने