सध्या महाराष्ट्रात शिंदे गटाविरोधातील '50 खोके एकदम ओके' ही घोषणा चांगलीच गाजत आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवरून सुरू झालेली ही घोषणा आता क्रिकेटच्या मैदानात देखील पाहायला मिळाली.
हिंदुस्थान-आस्ट्रेलियामधला दुसरा टी-20 सामना नागपूर येथील VCA मैदानावर रंगला होता. या सामन्यात काही क्रिकेट शौकीनांनी शिंदे गटाविरोधातील 50 खोकेची घोषणा असलेले बॅनर फडकवले. या बॅनरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले, या मुळे मैदानावर देखील 50 खोके एकदम ओकेचा नारा गुंजला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत