नदीतून होणारी 'पुष्पा' स्टाईल सागवान तस्करी उघड #gadchiroli #chandrapur


४ लाख ६६ हजारांचे लठ्ठे जप्त
संग्रहित छायाचित्र

गडचिरोली:- महाराष्ट्र आणि छत्तीसड सीमेवरून वाहणाऱ्या, इंद्रावती नदीची उपनदी असलेल्या कर्जेली नदीतून मोठ्या प्रमाणावर जंगलातील सागवान झाडांची कत्तल करून त्यांची तस्करी करण्याचा प्रकार वनविभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. यात ३७ सागवान लठ्ठे (ओंडके) जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ४ लाख ६६ हजार १९८ रुपये असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कर्जेली नदीच्या काठावर कत्तल केलेल्या सागवान झाडाचे लठ्ठे लपवून ठेवून आणि त्यांचे तराफे बनवून नदीपात्रातून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाचे दोन पथक तयार करून केलेल्या कारवाईत ६.४५६ घन मीटर आकाराचे ३७ लठ्ठे जप्त करण्यात आले.
यातील अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. बरसागडे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक तिरुपती सडमेक, महेंद्र हीचमी, विनोद गावडे, सचिन मस्के, अशोक गोरगोंडा, रामभाऊ जोखडे, ने गोटा, आशिष कुमरे, सुधाकर महाका वनमजूर बक्का मडावी, निलेश मडावी, सुधाकर गावडे, समय्या आत्राम, श्रीकांत कोंडागोर्ला, सुभाष मडावी आणि महेंद्र कुमरी आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत