Top News

पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू #chandrapur #death

चंद्रपूर:- पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्राचा इरई नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरातील दाताळा येथे रविवारी दुपारी घडली. गौरव विलास वांढरे (१६) रा.दाताळा, रोहन देवेंद्र बोपाटे (१६) रा.जुनी वस्ती दाताळा असे मृत मित्रांची नावे आहेत.
रोहन व गौरव हे दोन जीवलग मित्र होते. चंद्रपूर जिल्हा स्टेडियमसमोरील लोकमान्य टिळक विद्यालयात ते दहाव्या वर्गात शिकत होते. रविवारी सुट्टी असल्याने, ते आपल्या अन्य दोन मित्रांसह दाताळा जुन्या वस्तीकडे इरई नदीच्या पात्राजवळ पोहण्यासाठी गेले. सर्व जण पोहत असताना रोहन व गौरव खोल पाण्यात गेले. घाबरलेल्या मित्रांनी गावात धाव घेत, याबाबतची माहिती दिली. गावकरी लगेच धावत इरई नदीकडे आले. त्यांनी दोघांचाही शोध सुरू केला. यावेळी काही वेळात गौरवचा मृतदेह गावकऱ्यांच्या हाती लागला, परंतु रोहनचा थांगपत्ता लागत नव्हता.
दरम्यान, नागरिकांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच रेस्क्यू टीमसह घटनास्थळ गाठले. यावेळी गावकऱ्यांचा मदतीने शोध सुरू केला. काही अंतरावर रोहनचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने