Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात


दिव्यांग बांधवांचा पेढे वाटून आनंदोत्सव साजरा; माजी मंत्री बच्चू कडूंचे मानले आभार
कोरपना:- गेल्या दोन वर्षात कोरोना मुळे कोणतेही कार्यक्रम घेता आले नाही. दिनांक 12/11/2022 तीन वर्षांनी आपण सर्व अपंग बांधव एकत्र आलो. दरम्यान सतीश बिडकर, प्रमोद मोहूर्ले, नितीन सपकाळ यांनी मार्गदर्शन केले.

दिव्यांगांसाठी महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र मंत्रालय होत असल्याची माहिती त्यांनी दिली, या आनंदात दिव्यांग बांधवांना पेढे  वाटून जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आगामी जागतिक अपंग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. 

सभेचे आयोजक श्री.सतीश बिडकर, श्री.प्रमोद मोहुर्ले, श्री.नितीन भाऊ, सभेला उपस्थित सदस्य मंजुनाथ शेगोकार, पवन येनगुंटीवार, वाजिद शेख, साठवणे भाऊ, धरमपाल केवट, हनुमंत शेंडे, साजित हलदर, महादेव विश्वास, राजलक्ष्मी वरभे. , सूरज बार, आणि ममता निषाद मध्ये. सभेला उपस्थित सर्व सभासदांचे प्रहार दिव्यांग संघटना तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत