खासदार-आमदार दांपत्यांची बुलेट सवारी #chandrapur


चंद्रपूर:- भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी निघालेल्या बाईक रॅलीमध्ये चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी बुलेटवरून सवारी केली. यावेळी त्यांच्या पाठीमागे वरोरा - भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर बसल्या होत्या. शहरातून पहिल्यांदाच खासदार आणि आमदार धानोरकर दांपत्य दुचाकीवर स्वार होऊन रॅलीत सहभाग घेतल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत