Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

कोरपना तालुक्यातील शेतकरी ३ हेक्टरच्या मदतीपासून वंचित #chandrapur #Korpana


शासकीय अधिकाऱ्यांच्या गलधान कारभारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित

मदत मिळण्याकरीता शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांना निवेदन

कोरपना तालुक्यात माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली,त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले, त्यानंतर राज्य शासनाने २२ ऑगस्ट २०२२ रोजी शासन निर्णय काढून अतिवृष्टीची २ हेक्टरची मदत ३ हेक्टर तसेच प्रती हेक्टरी ६८०० वरून १३६०० करण्याचा निर्णय घेण्यात आला,परंतु कोरपना तालुका त्याला अपवाद ठरला,कोरपना तालुक्यात फक्त २ हेक्टर च्या प्रमाणात नुकसानीचे सर्व्ह करण्यात आले त्यामुळे ३ हेक्टरच्या मदतीपासून तालुक्यातील हजारो शेतकरी वंचित राहला आहे.
सदर प्रकरणाला तालुका स्तरावरील अधिकारी जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे,तसेच उर्वरित १ हेक्टर शेतजमीनीचा आर्थिक मदतीकरीता प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार कोरपना यांना निवेदन सादर केले.

तसेच नदी व नाल्या जवळील शेतजमीन खरवडून जाणे, शेतजमिनीत गाळ साचणे यांना शासनाच्या १३ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार मदत मिळायला हवी होती,यामध्ये शेतजमीन खरवडून जाणे याला हेक्टरी ३७५०० रुपये मदत आहे,ती सुधा मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही सदर मदत मिळविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी तहसीलदार यांच्याकडे केली.
तसेच अनेक गावातील अधिकाऱ्यांनी नदी व नाल्याजवळील शेतजमिनीची आराजी कमी लावल्यामुळे अनेक गावात काही प्रमाणात कमी आर्थिक मदत प्राप्त झाली आहे,यावरसुधा चौकशी करून वाढीव आराजी शासनाकडे पाठविण्यात यावी अश्या प्रमुख मागण्या घेऊन कोरपना तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना निवेदन देण्यात आले.कोरपना तालुक्यातील भोयगाव, भारोसा, गा, अंतरगाव बु,वनोजा, कढोली खुर्द, नारंडा,लोणी, पिपरी, शेरज खुर्द, शेरज बु, हेटी,कोडशी खुर्द,तांबाडी,गांधीनगर, कोडशी बू, जेवरा येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत