Top News

सामान्य कुटुंबातला आक्रमक वाघ म्हणजे आशिष #chandrapur #pombhurnaआशिष विलासराव कावटवार हे नाव पोंभूर्णा शहर, व तालुक्यातलं परिचीत असलेला नाव. कुणा कुणासाठी तर धडकी भरणारा नाव. तर कुणा कुणासाठी आपला आशिष भाऊ. तो अनेक वर्षांपासून दैनिक देशोन्नती या लोकप्रिय वर्तमानपत्रात पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतोय. यासोबतच आशिष राजकारणात सक्रिय आहे. तो पोंभूर्णा नगरपंचायतचा नगरसेवक तथा विरोधीपक्ष गटनेता म्हणूनही आपल्या कार्यक्षेत्राचा आवाका वाढविलेला आहे. तो शिवसेनेचा (सध्यास्थितीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा पोंभूर्णा तालुकाप्रमुख म्हणूनही काम करतोय.


आशिष म्हटलं की पत्रकार व राजकीय क्षेत्रातील डॅशिंग, डायनामिक, निर्भिड व्यक्तीमत्व अशी त्याची मुळ पर्सनालिटी आहे.आक्रमकही तेवढाच. एवढ्या कमी वयात त्याने जे मिळवलेलं आहे हे बघून त्याच्याबद्दल नवल वाटतं पण तितकंच त्याच्याबद्दल हेवाही वाटतो. परिस्थितीला कमजोरी न समजता त्याला ताकत समजून सामान्य व्यक्ती प्रगती कशी करतो याचं बोलकं उदाहरण म्हणजे आशिष‌ विलासराव कावटवार. 
तो गरिबी बघीतलेला आहे, त्यांनी आयुष्यातली दरी बघीतली आहे. तो लहान पणापासून स्वताला सिद्ध करण्यासाठी अनेकदा फडफडला आहे. तो अनेकदा कोसळला आहे. पण त्याच्या आयुष्यातील हिच गोष्ट त्याच्या जळणघळणीत फायद्याची ठरली. तो कधीच उत्कृष्ट नव्हता म्हणूनच तो प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत होता.जिथून मिळेल तिथून शिकत होता. हे शिक्षणच त्याला पत्रकारांच्या पठडीत उभं करू शकलं. मिसरूडही न फुटलेल्या वयात तो पत्रकारीता सुरू केला. याला अनेक लोकांनी (नामवंत पोंभूर्णा तालुक्यातील पत्रकारांनी) हातभार लावलेला आहे हे खरं आहे. आणि म्हणूनच तो कुठेही न डगमगता सुसाट धावत आहे. आपल्या उद्देशाला घेऊन. त्याचं नाव पोंभूर्ण्याच्या पत्रकार क्षेत्रात मोठं नाव आहे. पण हे नाव कमावण्यासाठी फक्त आणि फक्त त्याची मेहनत आहे. तो जे आहे ते त्यांनीच तयार केलेलं आहे.

आशिषची राजकारणातील एन्ट्री प्रचंड रोचक आहे.गाई म्हशीचं दुध काढून विकणाऱ्या कुटुंबातला सामान्य मुलगा आज राजकीय क्षेत्रातील आक्रमक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या(आता हि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने आहे) वाघासारखं डरकाळी फोडतो. खरं तर हि वाघाची डरकाळी फोडणं व त्या वारस्याला स्विकारणं हे नक्कीच त्याच्या वडिलाकडून त्याला मिळालेलं आहे. आशिषचे वडिल विलासराव कावटवार हे पुर्वीचे कट्टर शिवसैनिक. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची झालर त्यांच्या नसानसात होती.आणि म्हणूनच शिवसेना हा शब्द आशिषला ऐकायला मिळालं तो लहानपणापासूनच. आशिष आजही सांगतो माझे राजकीय गुरू माझे वडिलच आहेत म्हणून. कळत्या वयात आल्यानंतर तर त्यांनी या पक्षात स्वताला झोकून दिलं. एक सामान्य कार्यकर्ता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा तालुका प्रमुख असा त्याचा प्रवास पाहिलं की माणूस थक्क होऊन जातो. तो अनेकदा पक्षाकडून स्थानिक पातळीवर झालेल्या निवडणुकीत आपल्या फायर स्पिरीटची चुणूक दाखवली आहे. तो बऱ्याचदा गेम चेंजर ठरला आहे.आणि म्हणूनच त्याच्या राजकीय खेळीकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते.

पत्रकारीता व राजकारण या दोन्ही प्रत्येयाचा संतुलन त्यांनी चांगलं सांभाळून ठेवलेला आहे.तो प्रत्येक फारमेटमध्ये स्वताला उत्कृष्ट बनवत असतो. पत्रकारीता करतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलेले आहे,खरपूस समाचार ही घेतलेला आहे.तो अनेक विषय वृत्तसेवेच्या माध्यमातून मांडतो आहे. त्याची दखल घेण्यासाठी भाग पाडतो.


आशिष विलासराव कावटवार हे नाव पोंभूर्ण्यात परिचयाचे नाव आहे. राजकीय क्षेत्राचा भरीव अभ्यास त्याच्या पाठीशी आहे. तो जे मुद्दे शोधतो त्यावर त्यांची सखोल माहिती गोळा करण्याची त्याची हातोटी शिकण्यासारखी आहे.


खरंतर आशिष हा हळवा माणूस आणि म्हणूनच त्याच्या दैवतुल्य आईचं जाणं तो विसरूच शकला नाही. आईच्या आठवणीने तो पुरता डगमगून गेला होता. पण आईचे शेवटचे शब्द "तू मोठा माणूस बन " ह्या आईच्या शेवटच्या शब्दाने त्याला दुःखाचे वादळ पचविण्याची ताकत मिळाली.तो आईचे शब्द खरे करतोय....तो नक्कीच यशस्वी होईल यात शंकाच नाही. आशिष जो काही आहे तो आईमुळेच.

आईनेच त्याला लढणं शिकवलं आहे.कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढत असतानाही आईने आशिषला कधीच हरू दिलं नाही. ती स्वताही हरली नाही...ती लढत राहिली शेवटपर्यंत. आईची हिच फायटर स्पिरीट आशिषला फायटर बनवून गेली. आईचं आशिर्वाद आशिषवर आहे.  दि.३० आक्टोबर त्याचा वाढदिवस पण आजपर्यंत आईच्या हाताने औक्षवंत करून वाढदिवसाच्या दिवसांची सुरूवात करणारा आशिष आज एकटं होता पण त्याने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करून त्याचा औक्षवंत पुर्ण केला. आई हे बघून नक्कीच आनंदी झाली असेल. आयुष्य मस्त निडर होऊन जग... राजकारणात मोठं नाव कमव...

आशिषस तू आक्रमकस आहे पण या आक्रमकतेत कुणाचं नुकसान तर होणार नाही ना, हा मनाचा मोठेपणा तू जपलास तर नक्कीच आपला ध्येय लवकर गाठशील याचा विश्वास आहे. पण या साऱ्यात तू कधी वाकू नकोस. तूझी स्पिरीट अशीच अबाधित ठेव. पत्रकारीता, राजकारण,समाजसेवा हे सर्व करताना तुझ्या हातून आरोग्य सेवाही नेहमी घडावी हिच यानिमित्ताने अपेक्षा व खुप खुप सदिच्छा...!!
सुरज गोरंतवार,पोंभूर्णा

फोटो....


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने