Top News

2 लाखांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्यास अटक #arrested


चंद्रपूर:- कंत्राटदाराने बांधकाम केलेल्या पुलाचे 1 कोटीचे बिल काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिवती येथील कनिष्ठ अभियंता अनिल जगन्नाथ शिंदे या आरोपीला 2 लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
यवतमाळ येथील मुंगसाजी कन्स्ट्रक्शन कंपनीने जिल्ह्यातील जिवती तालुक्यात आरसीएलडब्यूई या केंद्र शासनाच्या योजनेतंर्गत पुल बांधण्याचे काम घेतले होते. कंत्राटदाराने पुल बांधकाम केल्यानंतर अंदाजे 1 कोटी रूपयांची चार बिले जिवती कार्यालयात सादर केली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जिवती येथील कनिष्ठ अभियंता अनिल जगन्नाथ शिंदे यांनी दोन बिले आता व उर्वरित दोन बिले नंतर मंजूर करवून देण्याच्या कामाकरिता दोन लाख रूपयांची लाच मागितली. कंत्राटदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे सापळा रचून कनिष्ठ अभियंता अनिल शिंदे याला 2 लाख रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने