इको-प्रोच्या "निसर्गासोबत युवा" शिबिरात वनाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद #chandrapur


वनविभागाच्या वन-वन्यजीव संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन

मानव-वन्यप्राणी संघर्ष परिस्थिती निवारण्याकरिता उपाययोजनाची माहिती
चंद्रपूर:- इको-प्रो पर्यावरण प्रेमी संस्थेच्या माध्यमातून मागील 26 ऑक्टोबर पासुन चंद्रपूर शहरातील सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोलीच्या विद्यार्थ्यांसाठी 'निसर्गासाठी युवा' विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांनी शिबिरातील युवकांशी संवाद साधला.

चंद्रपूर वनविभाग मधील चंद्रपूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली बफर चे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व ब्रम्हपुरी वनविभाग मधील नागभीड़ वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड़ आणि संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांची संवाद कार्यक्रमात उपस्थिती होती.
यावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वन विभागातील विविध कार्यांची आणि नोकरीच्या संधीवर माहिती दिली. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मानव वन्यजीव संघर्ष आणि वनांचे रक्षणाचे काम केले जाते. ताडोबा आणि ताडोबाच्या बाहेर वन विभागाच्या विविध उपक्रम आणि कार्यावर वन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी आगरझरी, मोहर्ली या परिसरात सुरू असलेल्या निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांची आणि नव्या उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी चंद्रपूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांनी चंद्रपूर शहरालगत वाढत असलेल्या वाघांच्या वास्तव्यावर आणि मानवी हस्तक्षेपावर विवेचन केले. चंद्रपूर शहरालगत कुठलेही जंगल नसताना महाऔषणिक विद्युत प्रकल्प, कोळसा खानीलगत वाघ आणि वन्यजीव प्राणी का येत आहेत, याची सखोल माहिती देत सुरु असलेल्या उपाययोजनाची माहिती दिली. नागभीड़ वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड़ यांनी सध्या सूरु असलेला वाघ-मानव संघर्ष व वाघ जेरबंद अभियान आणि गरज याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित वन अधिकारी यांनी मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी समाजाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत