Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाचे गैरवर्तन?


विद्यार्थिनींची विद्यापीठात तक्रार; कारवाईची मागणी 


गडचिरोली:- चेन्नई येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी गोंडवाना विद्यापीठात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. गोंडवाना विद्यापीठ यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. गोंडवाना विद्यापीठ काहीना काही कारणाने चर्चेत असतो. हा मुद्दा सुध्दा गोंडवाना विद्यापीठाच्या सभेत गाजण्याची शक्यता आहे. जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीने असे कृत्य करत असेल तर ही धक्कादायक बाब आहे.
 

   गोंडवाना विद्यापीठाकडून २५ जानेवारी रोजी चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींची चमू पाठविण्यात आली होती. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक डॉ. विजय सोमकुंवर हे होते. मात्र, चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले. इतक्यावरच न थांबता अमरावती व मुंबई विद्यापीठातील मुलींसोबत देखील चार्जर मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केले. पूर्ण वेळ हे  दारूच्या नशेत असायचे. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. स्पर्धा संपवून परत आलेल्या मुलींनी सोमवारी तत्काळ प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.

कोणत्याही विद्यापीठातील महिला खेळाडूंना स्पर्धांसाठी पाठविताना महिला प्रशिक्षक किंवा सहकारी देणे आवश्यक आहे. मात्र. गोंडवाना विद्यापीठाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे. हा सर्व प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे दोषी प्रशिक्षक व व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत