रासेयो शिबिरात स्वयंसेवकांना मिळाले करिअर मार्गदर्शन
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शिबिर आयोजित केले आहे. दि. 31 जानेवारीला पहिल्या सत्रात रोजगार, स्वयंरोजगार, करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपली आवड ओळखून करिअरची निवड करा. त्यासाठी प्रचंड मेहनत करा. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी झोकून देऊन काम करणं आवश्यक असतं. त्यादिशेने जिद्दीने वाटचाल करा,” असा मूलमंत्र वक्ते शैलेश भगत यांनी दिला.
या सत्राचे अध्यक्ष डॉ. उषा खंडाळे, प्रमुख वक्ते शैलेश भगत कौशल्य विकास अधिकारी चंद्रपूर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन निकिता लोडे, आभार समिक्षा कुरेकार हिने केली. तर रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. निखील देशमुख, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.