Top News

शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा:- राहुल ताकधट #chandrapur


रासेयो शिबिरात स्वयंसेवकांना शासकीय योजनेची माहिती

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शिबिर आयोजित केले आहे. दि. 31 जानेवारीला दुसऱ्या सत्रात शासकीय योजनेची माहिती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आयुष्यमान भारत, प्रधान आवास योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, अंतरजातीय विवाह योजना, अपंग विवाह योजना, वृद्ध कलाकार मानधन योजना, हलके व जड वाहन प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, शिलाई मशिन देणे, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, बांधकाम कामगार योजना, गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेची राहुल ताकधत जिल्हा समन्वय अनुलोम संस्था चंद्रपूर यांनी माहिती दिली.

या सत्राचे अध्यक्ष रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके, प्रमुख वक्ते राहुल ताकधत जिल्हा समन्वय अनुलोम संस्था चंद्रपूर मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन आचल इटनकर व आभार प्राची आंबटकर हिने केली. तर , तर रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने