Top News

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा संप मागे #chandrapur #Doctorचंद्रपूर:- जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीनंतर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे.

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय रूग्णालयात काही दिवसांपूर्वी एका निवासी वैद्यकिय अधिका-यावर एका रूग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये ते आंतरवासीय डॉक्टर जखमी झाले. या आधीही असे प्रकार इथे घडले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात काम करणा-या निवासी डॉक्टर्स व अंतरवासीय डॉक्टर्स गेल्या काही दिवसांपासून संपावर होते. या सर्व डॉक्टरांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने सोडविण्यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले व त्यानुसार तातडीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे यांच्या कक्षात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नागपूरहून संपकरी डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेले वैद्यकिय शिक्षण विभागाचे संयुक्त संचालकांसह जिल्हयाचे अधिकारी व भाजपाचे चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, आएमएच्या सचिव डॉ. नगीना नायडू, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आंतरवासीय डॉक्टर्स व निवासी डॉक्टर यांनी अनेक मुद्दयांवर हा संप केला असल्याचे सांगितले. त्यात प्रामुख्याने सुरक्षेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. दवाखान्यांतील विविध विभागांमध्ये सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असल्याचे यावेळी सर्वांनी मान्य केले. याकरिता सुरक्षेचे एक ऑडीट होणे आवश्यक आहे असे बैठकीत ठरले. त्यानुसार डॉ. जिवने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने पुढील तिन दिवसात सुरक्षेचे ऑडीट करून आपला अहवाल अधिष्ठाता यांच्याकडे द्यावा, असे ठरले. त्यानंतर अधिष्ठाता वाढीव सुरक्षा रक्षकाच्या मागणीसाठी आपला प्रस्ताचव करून विभागाला पाठवतील, असेही बैठकीत ठरले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने