पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड आणि आभा कार्डचे फि मध्ये वाटप #chandrapur

सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांचा एक हात मदतीचा

गोकुल नगर गडचिरोली येथे वाटप


गडचिरोली:- अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून गोंडवाना विद्यापीपिठाच्या सिनेट सदस्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते गोकुलनगर, गडचिरोली येथे अनेक गोरगरिबांना ई-श्रम कार्ड, पॅन कार्ड तसेच आभा कार्डचे मोफत वाटप करण्यात आले.

शासकीय उपक्रमांचे लाभ गोरगरिब जनतेला व्हावा या उद्देशाने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक गावामधे जाऊन प्रत्यक्ष तनुश्रीताई आणि चमु उपस्थित राहून लोकांना अनेक योजनांची माहिती पटवून देण्यात आली.

यावेळी उपस्थित गडचिरोलीचे जेष्ठ पत्रकार रुपराज वाकोडे, गोकुल नगरचे नागरिक जाईनाब शेख, सुशीला कानकवार, अमोल कुलमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.

शासकीय योजनापासून कोणीही वंचित राहू नये या उद्देशाने आम्ही जनेतेच्या सेवेसाठी सतत काम करत राहू अशी ग्वाही तनुश्रीताईं धर्मरावबाबा आत्राम जनतेला दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत