नियोजन भवन येथे कामगार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीला #chandrapurचंद्रपूर:- चंद्रपुर महानगरपालिका येथील (संत गाडगे बाबा असंघटित कामगार संघटना) कंत्राटी कामगारांचे पगार किमान वेतनानूसार वेळेवर मिळण्याकरिता व इतर समस्यांच्या निवारणाकरिता दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर मांच्या मार्गदर्शनात भाजयुमो सचिव सतिश तायडे, भाजयुमो मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांच्या नेतृत्वात नियोजन भवन येथे २०० कामगारासह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.

कामगारांच्या मागण्या, समस्या ऐकूण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवावे असे आदेश दिले. तसेच दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता महानगरपालीच्या कामगारांची बैठक बोलवण्यात आली असून बैठक जिल्हाध्यक्ष भाजपा डॉ. मंगेश गुलवाडे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजयुमो सचिव सतिश तायडे, भाजयुमो मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, व कामगारांचे अध्यक्ष रतन गायकवाड, प्रकाश जुमडे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

यावेळी अध्यक्ष रतन गायकवाड, प्रकाश जुमडे, सुधीर प्रतापगिरवार, दिवाकर ठाकुर, आकाश गेडाम, मरिती तपासे, चंद्रकला वाकटोल, छाया पराते, अक्षय मोगरे, अमित महाजन, रजिन्द्र बगैर, तसेच सर्व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत