लोकसेवा कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या अध्यक्ष पदी राजुरकर, सचिव पदी मोहीते #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

भद्रावती:- येथील लोकसेवा मंडळाद्वारे संचालीत येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लोकसेवा कर्मचारी सहकारी पत संस्था र.नं.३०२ ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यात अध्यक्ष पदी शिक्षक शरद राजुरकर यांची, तर सचिव पदी शिक्षक विकास मोहीते यांची अविरोध निवड करण्यात आली.

येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अध्यासी अधिकारी येवले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक नुकतीच बोलाविण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून शरद राजुरकर यांची अविरोध निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून विकास मोहीते यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत संचालक म्हणून रुपचंद धारणे, प्रफुल्ल वटे, आशुतोष सुरावार, प्रा. नितीन लांजेवार, सचिनकुमार मेश्राम, रविकांत नंदनवार, मिनाक्षी वासाडे, भारती येरेवार व नरेश बोरसरे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सर्व संचालक, प्राचार्या आशालता सोनटक्के, उपप्राचार्य सचिन सरपटवार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)