महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50% सूट

Bhairav Diwase
0

भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून केला आनंद  साजरा 


पोंभुर्णा:- भाजपा महिला आघाडीच्या वतीने मा. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक व मत्स कार्य मंत्री यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेला महिलांसाठी एसटी मध्ये प्रवास 50 टक्के सूट कोणतीही वयाची अट नाही महिला म्हणून तिचा सन्मान सरकारनी केला. भाजपा महिला आघाडी कडून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. खरं तर बसनी प्रवास करणाऱ्या महिला या सर्वसामान्य कुटुंबातील असतात आणि त्यांना ही सूट देऊन सरकारनी महिला दिनाची मोठी भेट बहिणींना दिली. बस मधील महिलांशी संवाद साधला असता त्यांनी आनंद व्यक्त केला. आमी भाजपा महिला आघाडीच्या वतीने मा. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार वने व पालकमंत्री आणि  महाराष्ट्र सरकार यांचे खूप खूप धन्यवाद मानले . 

यावेळी अल्का आत्राम भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष, सौ. सुलभा पीपरे नागराध्यक्ष, श्वेता वनकर भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष तथा सभापती , आकाशी गेडाम सभापती, शारदा गुरनुले नगरसेविका, नंदा कोटरंगे नगरसेविका, उषा गोरंतवार, मंजुषा ठाकरे आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)