चंद्रपूर जिल्ह्यात तीन वर्षाच्या चिमुकल्याची दारूच्या नशेत वडिलाने केली हत्या #chandrapur #gadchiroli #mul #murder

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- दारूच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबुन हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास मुल तालुक्यातील राजोली येथे घडली. गळा दाबुन हत्या केलेल्या पित्याने स्वतःच्या गळावर चाकुने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियांशु गणेश चौधरी वय 3 वर्षे असे मृतक चिमुकल्यांचे नाव आहे. तर गणेश विठ्ठल चौधरी वय 31 वर्षे असे आरोपीचे नाव आहे. A three-year-old child was killed by his drunken father in Chandrapur district


मूल तालुक्यातील राजोली येथील गणेश विठ्ठल चौधरी वय 31 वर्षे हा आपल्या पत्नी आणि मुलासह राजोली येथे राहात होता. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेली, घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होता, दरम्यान रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला, आणि स्वताच्या गळावर चाकुने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सदर घटनास्थळावर मूल पोलीस पोहचून पंचनामा केला असुन जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)