Top News

कुख्यात गुंड यदुराज उर्फ बच्ची आरक याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई #chandrapur #police



https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- कुख्यात गुंड यदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक, वय 24 वर्ष, रा. सुभाष वार्ड बल्लारपुर याचे विरुध्द गैरकायद्याची मंडळी जमवुन शस्त्रानिशी लोकांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, लोकांना शस्त्रांचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे, टोळीने गुन्हे करणे, वस्तीतील सर्वसामान्य नागरीकांमध्ये भिती निर्माण करणे ईत्यादी साखरे गंभीर स्वरुपाचे एकुण 13 अपराध केले आहे. त्याचेविरुध्द मुंबई पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये तडीपार कारवाई करुन सुध्दा त्याचेवर या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि त्याची गुन्हेगारी व हिंसेच्या प्रवृत्तीमुळे सदर इसम निर्दालेला कुख्यात गुंड म्हणुन आपली प्रचिती करीत नागरीकांच्या सार्वजनिक सुरक्षितेस तसेच शांतता व सुव्यवस्थेचा धोका निर्माण करीत असल्यामुळे समाजहिताच्या दृष्टीने तसेच सदर इसमाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत बदल होवुन चांगले वर्तणुकीसाठी तसेच सर्वसामान्य लोकांचे मनातील भिती दूर होण्यासाठी आणि जिल्हयातील शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता सदर इसमाविरुध्द मा. पोलीस अधीक्षक यांचे शिफारसी वरुन मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य संबंधीत गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि व्हिडीओ पायरेट्स यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्या संबंधी अधिनियम, 1981 अंतर्गत कलम 3 अन्वये सदर इसमावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.

मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिनांक 24/05/2023 रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस स्टेशन बल्लारपुर चे हद्दीत राहणारा शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यांत गुंड यदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक, वय 24 वर्ष, रा. सुभाष वार्ड बल्लारपुर यास महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य संबंधीत गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि व्हिडीओ पायरेट्स यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्या संबंधी अधिनियम, 1981 अंतर्गत आदेश पारीत करण्यात आला आहे.

कुख्यांत गुंड यदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक, वय 24 वर्ष, रा. सुभाष वार्ड बल्लारपुर याचे विरुध्द वरील नमुद स्थानबध्दतेची कारवाई पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजा पवार, पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील, पो.स्टे. बल्लारपूर पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, पोस्टे बल्लारपुर येथील सपोनि श्री शैलेद्र ठाकरे, सपोनि श्री विकास गायकवाड, सपोनि श्री रमेश हत्तीगोटे, सपोनि प्रमोद रासकर, पोउपनि चेतन टेंभुर्णे आणि पोस्टे रामनगर येथील सपोनि योगेश खरसाण, पोहवा सुधाकर वरघणे ( बल्लारपुर) अरुण खारकर (स्थागुशा) पोशि शेखर माथनकर, मपोशि सिमा पोरते (बल्लारपुर ) यांनी केली आहे.

यावर्षी मागील 3 महिण्यात ही दुसरी कार्यवाही असुन यापुढे ही जिल्हयातील अशा गुंड प्रवृत्तीच्या इसमांची यादी तयार करण्यात आली असुन त्यांच्याविरुध्दही अशाच प्रकारची MPDA अंतर्गत स्थानबध्दतेची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने