Top News

“तूच दुर्गा, तू रणरागिणी, ढाण्या वाघाची तू वाघिणी”, आमदार प्रतिभा धानोरकर यांची पोस्ट चर्चेत #chandrapur #socialmedia #post


चंद्रपूर:- खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधन होऊन चार दिवसांचा कालावधी लोटत नाही पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ‘तूच दुर्गा, तू रणरागिणी, ढाण्या वाघाची, तू वाघिणी’ या समाज माध्यमावरील पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. या पोस्टच्या माध्यमातून आमदार प्रतिभा धानोरकर यांनी एकप्रकारे काँग्रेस पक्षातील त्यांचे विरोधक व अन्य पक्षातील विरोधकांना इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

कष्टाने आणि प्रेमाने बनवलेल्या सूर्यकिरण बंगल्यात राहण्याचं बाळूभाऊचं स्वप्नचं राहील

चंद्रपूर-वणी-वरोरा लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे ३० मे रोजी दिल्लीत अकाली निधन झाले. धानोरकर यांच्या निधनाला अवघे चार दिवसांचा अवधी झाला आहे. मात्र राजकीय वर्तुळात आतापासूनच लोकसभा निवडणुकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. दिवंगत खासदार धानोरकर यांच्या नंतर या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व कोण करणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
चंद्रपुरचा ढाण्या वाघ व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा:- आ. प्रतिभा धानोरकर 

ही चर्चा रंगली असतानाच आता धानोरकर यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांनी बाळू धानोरकर व प्रतिभा धानोरकर या दोघांचे छायाचित्रसह ‘तूच दुर्गा, तू रणरागिणी, ढाण्या वाघाची, तू वाघिणी’ असा मजकूर असलेली एक पोस्ट समाज माध्यमावर सार्वत्रिक केली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांची ही पोस्ट म्हणजे काँग्रेस पक्षातील त्यांचे राजकीय विरोधक व अन्य पक्षातील विरोधकांना इशारा असल्याचे म्हटले जात आहे.
खासदार बाळू धानोरकर यांचे निधन


विशेष म्हणजे दिवंगत खासदार धानोरकर यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार व राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचा गट सक्रिय झाला होता. त्यामुळे आमदार धानोरकर यांचा इशारा हा काँग्रेसचा या दोन्ही नेत्यांना देखील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान दिवंगत खासदार धानोरकर यांच्या अस्थींचे शुक्रवारी मारकंडा येथे वैनगंगा नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. तर आज शनिवार पासून धानोरकर यांचे चंद्रपुरातील संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. ११ जून पर्यंत काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांना श्रद्धांजली कार्यक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहे. दरम्यान चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक कोण लढणार हा प्रश्न आहेच.

वडिलांच्या अंतिमदर्शनाचा ठरला खासदार बाळूभाऊंचा अखेरचा फोटो!

खासदार बाळू धानोरकर अनंतात विलीन

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने