"रेनकोट कुठे आहे त्याचा?" पावसात भिजणाऱ्या गणपती बाप्पाला पाहून चिमुकलीचा प्रश्न #chandrapur #socialmedia #viralvideo


चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

लहान मुलांचं आणि गणपतीचं एक अनोखं नातं असतं. तुम्ही पाहिलंच असेल की लहान मुलांची गणपती बाप्पाशी संबंधित अनेक चित्रपट आहेत गाणे आहेत. काही गाणी तर लहान मुलांनी स्वतः गायलेली आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनावेळी सुद्धा लहान मुलांइतकं उत्सुक कुणीच नसतं. बाप्पा बाप्पा करत लहान मुलं साऱ्या घरभर फिरत असतात. मग त्यांचे प्रश्न पण मजेशीर असतात. बाप्पा काय खातो? उंदीरमामा बाप्पाचा कोण? बाप्पा कुठे राहतो…वगैरे वगैरे. प्रश्न विचारून लहान मुलं भंडावून सोडतात.


एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. एक लहान मुलगी उद्यानात जाते. आई वडिलांसोबत तिथे गेल्यावर तिला त्या उद्यानात गणपती बाप्पाची मोठी मूर्ती दिसते. ती मूर्ती पावसात भिजत असते. मुलीने पाऊस पडतोय म्हणून रेनकोट घातलेला असतो. मुलगी बाप्पाला बघते आणि हात जोडते. बाप्पाकडे बघताना तिच्या लक्षात येतं, अरे बाप्पाने तर रेनकोट घातलेलाच नाहीये. मग ती विचारते, रेनकोट कुठे आहे त्याचा? यावर तिचे पालक शांत बसतात आणि त्यांना काय उत्तर द्यावं हे कळत नाही. ते तिला विचलित करायचा प्रयत्न करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत