चंद्रपूर:- जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आज दि. 09 जुलै स्थापना दिवस देशभरामध्ये विद्यार्थी दिन म्हणुन साजरा केला जातोय. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील युवकांना विधायक कार्यात सामील करत 1948 पासुन राष्ट्रप्रेमी युवक घडविण्यांमध्ये अभाविप चे योगदान आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा चंद्रपूर च्या वतीने चंद्रपूर शहरातील नामांकित सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये विद्यार्थी दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डॉ. मुर्लीधर चांदेकर (माजी कुलगूरु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ), प्रमुख उपस्थिती गुरूदास कामडी (व्यवस्थापन परिषद अधिसभा सदस्य गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली), प्रमुख वक्ता शक्ती केराम (अ.भा.वि.प. विदर्भ प्रांत मंत्री) यांच्यासह अभाविप चे नगर अध्यक्ष डॉ. पंकज काकडे, जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, नगरमंत्री रोहीत खेडेकर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी त्यांनी समयोचित भाषणेही केली. या कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थीनी, अभाविप पूर्व कार्यकर्ते, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व अन्य मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.