रस्त्यावरील फुटपाथवर झालेले अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे करण्यासंदर्भात निवेदन.
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील नागरिकांच्या हक्काचे फुटपाथवर झालेले अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी असंघटीत कामगाराचे जिल्हा उपाध्यक्ष श्री ब्रिजेश तामगडे यांचे नेतृत्वाखाली चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आहे.
चंद्रपूर शहरात लोकांना जाण्या-येण्यासाठी महानगरपालिकाने फूटपाथ ठेवले आहेत; मात्र या फूटपाथवर फेरीवाले, दुकानदार यांनी अतिक्रमण करून जागा आपल्या मालकीची असल्याचे भासवत आहेत. यामुळे सामान्य नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थी यांना बाजारपेठेतून चालण्याचा त्रास होत आहे.
त्याकरिता जिल्हा कॉंगेस कमिटीने महानगरपालिकेला निवेदन सादर केले आहे त्याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटी असंघटीत कामगार जिल्हाध्यक्ष संदीप सिडाम, ॲड. राहुल मेंढे, संगितराव नामगडे, मनोज खांडेकर, सत्यप्रकाश ठमके, हाजी अली, आदी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत