अत्यंत दुर्मिळ प्रजातीच्या कासवाची विक्री; दोघे ताब्यात #chandrapur #gondpipari


गोंडपिपरी:- अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा असिएटिक साफ्ट शेल प्रजातीच्या कासव विकण्यासाठी घरी बाळगल्याचा धक्कादायक प्रकार गोंडपिपरीत समोर आला. याप्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी प्रमोद भगाकार पोटे (३७, रा. भंगारपेठ, ता. गोंडपिपरी), रवींद्र व्यंकोजी मडपल्लीवार (३५, रा. शिवणी देशपांडे, ता. गोंडपिपरी) या दोघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगारपेठ येथील प्रमोद पोटे याच्या घरी दुर्मिळ प्रजातीचा कासव विक्रीसाठी आणून ठेवल्याची माहिती गोंडपिपरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू यांना मिळाली. त्यांनी पंचासमक्ष छापा टाकून त्याच्या घराची झडती घेतली. घरात एक नग असिएटिक साफ्ट शेल प्रजातीच्या दुर्मिळ कासव आढळून आला. त्याने तो कासव रवींद्र व्यंकोजी मडपल्लीवार याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी, धाबा परिक्षेत्र (ता. गोंडपिपरी) यांच्या स्वाधीन केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जीवन राजगुरू, वंदीराम पाल, नंदकिशोर माहूरकर, अनुप निकुरे, प्रेम चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनि विनोद भुरले, पोहवा प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार मुजावर अली, कार्तिक खनके आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत