नवयुवक लोकशाहीचे आधारस्तंभ #chandrapur #chimur

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे दिनांक 2/08/2023 ला रोज बुधवारला करिअर काउन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेल, समान संधी उपक्रम केंद्र, आयक्यूएसी विभाग व तहसील कार्यालय चिमूर यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमाणी यांच्या मार्गदर्शनात एकदिवसीय मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रम महसूल सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी तहसील कार्यालयाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राजक्ता बुरांडे मॅडम, तहसीलदार, चिमूर, तसेच श्री. डी. के. निकुरे, श्री. पारसे सर तसेच महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अमीर धमाणी, डॉ. संदीप सातव व डॉ. निलेश ठवकर मचांवर उपस्थित होते.
प्राजक्ता बुरांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीतील युवकांचे महत्व तसेच तहसील कार्यालयातील विविध योजना व त्यांच्या कार्यालयामार्फत दिल्या जाणारे कागदपत्रे जसे उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला नॉन -क्रिमीलियर दाखला या सारखे डॉक्युमेंट्सची माहिती दिली. तसेच श्री. नीकुरे यांनी विद्यार्थ्यांना इलेक्शन कार्डचे महत्व व कसे काढता येईल या वर मार्गदर्शन केले. श्री. पारसे यांनी तहसील कार्यालयातून भेटणाऱ्या कागदपत्र या विषयी माहिती दिली.
प्राचार्य डॉ. अमीर धमाणी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थांना तहसील कार्यालयातून आलेल्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले व आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. विवेक माणिक यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पारसे यांनी केले. प्रा. संदीप सातव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)