ब्रम्हपुरी येथे मंडल यात्रेच्या आगमनानिमीत्त ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी जनजागृती कार्यक्रम संपन्न #chandrapur

Bhairav Diwase
0


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय बिंजवे, ब्रम्हपुरी 
ब्रम्हपुरी:- 'मंडल दिना'चे औचित्य साधून विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये दिनांक ३० जुलै ते ६ ऑगष्ट २०२३ पर्यंत ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी जनजागृती अभियानांतर्गत जनजागृती व्हावी यासाठी ओबीसी युवा अधिकार मंचचे प्रमुख संयोजक उमेश कोर्राम आणि संघर्ष वाहिनी-भटके विमुक्त संघर्ष परिषदचे संयोजक दीनानाथ वाघमारे यांचे नेतृत्वात मंडल यात्रा सुरू आहे.
या मंडल यात्रेचे आगमन १ऑगस्ट रोजी ब्रम्हपुरी शहरात झाले. यावेळी मोठ्या उत्साहात या यात्रेचे ओबीसींच्या युवा कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर ही मंडल यात्रा घोषणा देत, शहरातील टिळक नगर पासून बाजार चौक,शिवाजी चौक,ख्रिस्तानंद दवाखाना चौक फिरून स्वागत मंगल कार्यालयात दाखल झाली.
स्वागत मंगल कार्यालयात झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून यात्रेचे नेतृत्व करीत असलेले ओबीसी युवा अधिकार मंचचे प्रमुख संयोजक उमेश कोराम,संघर्ष वाहिनी(भटके विमुक्त संघर्ष परिषद )चे प्रमुख संयोजक दिनानाथ वाघमारे नागपूर,अनिल डहाके चंद्रपूर, प्रशांत भेले नागपूर यांनी मार्गदर्शन केले.या वक्त्यांनी जातनिहाय-ओबीसी जनगणना,महाज्योती च्या योजना,विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि स्वाधार योजना व्यवसायिक अभ्यासक्रमची फी माफी,इतर मागास विभागाला निधी,शिक्षक भरती,शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समन्वयक ओबीसी आघाडी-काँग्रेसचे अँड. गोविंदराव भेंडारकर होते.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल सुतार समाजचे अध्यक्ष विजय शास्त्रकार,धनगर समाज संघटनेचे बाळकृष्ण शेळके,प्राचार्य दामोधर शिंगाडे वडसा,प्रा धोटे वडसा,अँड हेमंत उरकुडे, चौधरी साहेब ,मुख्यध्यापक रणदिवे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी युवा अधिकार मंचचे ब्रम्हपुरी तालुकाचे प्रमुख संयोजक जगदीश(मोंटू)पिलारे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन तेजस गायधनी तर आभारप्रदर्शन देवानंद ठेंगरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओबीसी युवा अधिकार मंचच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी आणि ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)