मंडल यात्रेचे राजुरा नगरीत जल्लोषात स्वागत.

मंडल यात्रेचे राजुरा नगरीत जल्लोषात स्वागत.

राजुरा :- मंडल दिनाचे औचित्य साधून ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी जनजागृती अभियानाअंतर्गत विदर्भातील ७ जिल्ह्यांत मंडल यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा 3 ऑगस्ट रोजी राजुरा येथे दाखल झाली. या  यात्रेचे ओबीसी सेवा संघ तर्फे मनोभावे स्वागत करण्यात आले.


जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना ७२ वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू झाली पाहिजे, सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना शंभर टक्के फी माफी झाली पाहिजे. महाज्योती संस्थेला एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला पाहिजे, इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला पाहिजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय तसेच अधिकारी व ओबीसी भवन निर्माण झाले पाहिजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाला तिस हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा या विविध मागण्या घेऊन नागपूर येथून ही मंडल यात्रा पुढे निघाली आहे.

मंडल यात्रा राजुरा येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होताच मोठ्या जयघोषात स्वागत करण्यात आले , छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मान्यवरांनी बाईक रॅली ला सुरुवात केली व ही रॅली संपूर्ण शहरातून निघून अखेर संविधान चौकात रॅली चा समारोप झाला या वेळी समारोपीय मार्गदर्शन श्री उमेश कोराम यांनी केले तर प्रा अनिल डहाके यांनी यात्रे संबंधी मार्गदर्शन केले,केतन जूनघरे यांनी प्रस्तावना केली. यात्रे सोबत ऍड पुरुषोत्तम सातपुते , डॉ ऍड अंजली साळवे , प्रा दौलतराव भोंगळे, सौ कुंदाताई जेणेकर,  व इतर कार्यकर्ते आले होते.  बाईक रॅली चे आयोजन व मंडल यात्रेचे स्वागत  ओबीसी सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केतन जूनघरे , अमित मालेकर सुजित कावळे ,रामभाऊ ढुमणे, स्वप्नील मोहूर्ले, अंकुश मस्की, सूरज गव्हाणे, प्रजवल ढवस , हितेश जयपूरकर,  रमेश झाडे, ओंकार अस्वले, वैभव अडवे, प्रतीक कावळे, दीपक झाडे,  तथा समस्त ओबीसी बांधव यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या