मात्र पोलीस प्रशासन निभावते फक्त बघ्याची भूमिका?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- आज अशी वेळ आली आहे की सामान्य नागरिकांना घर चालवणे कठीण झाले आहे, मात्र असे असताना संपूर्ण तालुक्यात आणि गावागावात सट्टा आणि अवैध दारूविक्री थांबण्याचे नाव घेत नाही. सकाळपासूनच शहरातील दुकानांमध्ये दारूचा साठा पाहायला मिळत आहे. लांबलचक रांगा ज्यामध्ये वाइनप्रेमी जास्त दिसत आहेत.
एकीकडे शहरात तसेच गावकऱ्यांमध्ये बेटिंग बेधडकपणे सुरू आहे. ज्यामध्ये अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यातच बुकी आणि दारू विक्रेत्यांचे मनोधैर्य दिवसेंदिवस वाढू लागले आहे. संपूर्ण तालुक्यात अवैध दारू विक्रेते, व सट्टा मटका विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानीक नागरिकांकडून होत आहे परंतु, बुकी आणि दारू विक्रेते हे गुंडप्रवितीचे असल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्यास कोणीही धजवत नाही आहे.
आमच्या टीमने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गडचांदूर पोलीस स्टेशनपासून अगदी जवळ माणिकगड गेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री व तिथेच बसून खुलेआम दारू ढोसताणा दिसून आले, तसेच गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये अवैध दारु विक्री जोमात सुरु आहे, यात परिसरातील बैलमपुर, नौकारी, बिबी, नांदा, आवाळपुर, अंतरगाव, सांगोडा,सोनापुर, हिरापुर या गावांचा समावेश आहे.दारू विक्रेत्यांकडून 'मलिंदा' मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन मात्र कानाडोळा करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांशी संवाद साधत असता नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे गडचांदुर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माणिकगड चौकातील धाब्यावर सर्रास हे धंदे राजरोस सुरू असून सध्या या ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैधरित्या थाटलेल्या या दुकानाच्या आसपास तळीरामांची गर्दी दिसून येते. ग्राहकांसाठी येथे अड्डाचालक पाणी पाऊच, ग्लास तसेच चखण्याची देखील व्यवस्था असल्याने हे अड्डे चांगलेच चालत आहेत. येथील व्यापारी वर्ग, तसेच खरेदीसाठी येणारे ग्राहक यासर्व बाबींनी त्रस्त झाले आहेत, मात्र गडचांदुर पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई या विक्रेत्यावर होत नसल्याचे नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. गडचांदुर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे याकडे सर्रास दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे. पूर्वी चोरटेपणाने चालत असलेला सट्टा बाजार आज कायद्याच्या हलगर्जीपणामुळे व काही राजकिय आश्रयाने खुलेआम सुरू आहे. ओपन, क्लोज आणि रनिंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या खेळात ज्या प्रकारे सर्व काही उघड होत आहे, त्यावरून बुकिंना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत