Top News

वृध्द महिलेचा रेल्वे अपघातात मृत्यू #chandrapur #ballarpur


बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गाव रेल्वे मार्गामुळे विभागले आहे. या गावाच्या मध्यभागातून तीन रेल्वे मार्ग असून चौथ्या मार्गाचे काम सुरु आहे. व अंडरपास पुलामुळे रेल्वे गेट बंद करण्यात आले परंतु अंडरपास पुलात पावसाचे पाणी व घान साचून असल्याने जाता येत नसल्याने बरेच नागरिक बंद रेल्वेगेट जवळील रस्त्याने ये-जा करतात असेच या मार्गे एक वृद्ध महिला जात असताना बल्लारपूर चंद्रपूर अप मार्गांवर रेल्वेची जबरदस्त धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ( दि.४) सकाळी १०.३५ वाजता दरम्यान विसापूर बंद रेल्वेगेट जवळील पोल क्रमांक ८८५ बी/२३ ते ८८५ बी/२१ दरम्यान घडली.रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव अंजनाबाई दामाजी आळे (८०) रा. सम्राट चौक विसापूर ता. बल्लारपूर असे आहे
अंजनाबाई बरेच दिवसापासून आजारी असल्याने बँकेतून पैसे काढतो आणि उपचाराला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात जातो म्हणून गावातील वस्ती असलेल्या बँकेत जाते म्हणून नातीला सांगून निघाली होती. आणि कायमची निघून गेली. ही दुर्दैवी घटना अंडरपास पूलात पाणी व घाण साचल्याने वरिष्ठ नागरिकांना तेथून जाता येत नसल्याने बंद रेल्वेगेट जवळ तीन ट्रक असल्यामुळे रेल्वेगाडी कोणत्या मार्गाने येत आहे. याचा अंदाज तिला आला नाही आणि रेल्वे ट्रक ओलांडताना सुसाट वेगाने येत असलेल्या रेल्वे गाडीने तिला जबर धडक दिली व ती जागीच गतप्राण झाली.

पावसाळ्यात अंडरपास पुलात घाण व पाणी साचून राहते जर आज येवढ्या मोठ्या गावात फूट ओव्हर ब्रीज असते तर ही घटना घडली नसती असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी म्हटले तिच्या पश्च्यात तीन मुले, तीन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.या घटनेचा अधिक तपास बल्लारपूर रेल्वे पोलीस व विसापूर चौकीचे पोलीस करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने