वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0
पोंभुर्णा तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेची मागणी

पोंभुर्णा:- संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी आपल्या थोर पुरुषांबद्दल अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेत बोलून त्यांचा अवमान केला. त्यांनी सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अवमान जनक व्यक्तव्य केले. तसेच राजा राममोहन राय व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे थोर महापुरुषांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील बहुसंख्य वर्गाच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्या महापुरुषांचा वारंवार अपमान करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजी भिडे करीत आहे. बहुजन महापुरुषांच्या नावाने युवकांची मती भडकवून आमच्याच लोकांना एकमेकांच्या जातीविरोधात उभे करणे आणि त्यांच्यामध्ये दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न भिडे करीत आहेत.
त्यामुळे आपल्या थोर महापुरुषांविषयी वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याचा पोंभुर्णा तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने महात्मा फुले चौकात निषेध करण्यात आला. भिडे वर तात्काळ कारवाई करणेबाबत मा. मुख्यमंत्री यांना तहसीलदार पोंभुर्णा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. तसेच भिडेला तात्काळ अटक करावी अशी मागणी पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथे करण्यात आली. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.

यावेळी भूमिपुत्र ब्रिगेड, अखिल भारतीय माळी महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, बिरसा क्रांती दल, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे), सत्यशोधक युवा मंच, व इतर सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी गुलाब गुरनुले, सद्गुरू ढोले, गणेश वासलवार, भुजंगराव ढोले, अविशकुमार वाळके, श्रीकांत शेंडे, अतुल वाकडे, धनराज कोवे,आशिष कावळे, चेतन गुरनुले, अनिकेत गुरनुले उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)