Top News

धान विक्रीकरिता शेतकऱ्यांना करावी लागणार नोंदणी #chandrapur


चंद्रपूर:- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत राज्य शासनामार्फत आदिवासी विकास महामंडळ धानाची खरेदी करतात. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात संस्था आणि महामंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत उपप्रादेशिक कार्यालय चिमुर व गोंडपिपरी अंतर्गत, हंगाम २०२३-२४ करीता ३५ खरेदी केंद्रे धान खरेदीकरिता मंजूर केली आहेत. या केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.

धान उत्पादक जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान लागवड करण्यात आली आहे. यावर्षी केंद्रांवर धान विक्रीस आणण्याकरिता शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळच्या आदिवासी विकास महामंडळ किंवा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करावी. सोबतच बँक खात्याची केवायसी पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी पूर्ण करून केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने