Click Here...👇👇👇

राधिका दोरखंडे ठरली बेस्ट स्टूडेंट ऑफ दी ईयर.

Bhairav Diwase
राधिका दोरखंडे ठरली बेस्ट स्टूडेंट ऑफ दी ईयर


राजुरा:-  शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे सहा दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आली. या वर्षीचा बेस्ट स्टूडेंट ऑफ दी ईयर - 2023 हा पुरस्कार शिवाजी महाविद्यालय ची विद्यार्थिनी राधिका दोरखंडे हिने पटकाविला. महाविद्यालयाकडून १० हजार रोख आणि अविनाश दोरखंडे यांची आई यांच्या स्मृति प्रीत्यर्थ स्मृति चिन्ह प्रदान करण्यात आले. द्वितीय पुरस्कार तीन हजार रोख साक्षी कांबळे हिने पटकाविला तर तृतीय पारितोषिक रोशनी बोरकुटे तसेच प्रोत्साहन पारितोषिक जान्हवी बोढे हिने पटकविला.

स्पर्धेचे परीक्षण डॉ. शरद पोकळे, डॉ. भालचंद्र आतकुलवार , डॉ. मनोज राघमवार यांनी केले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे सचिव अविनाश जाधव, शिवाजी महाविद्यालय राजुरा चे प्राचार्य डॉ एस एम वरकड, उप प्राचार्य डॉ राजेश खेरानी यांच्या हस्ते पुरस्कार राधिका दोरखंडे याना प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी डॉ. चेतना भोंगाडे, डॉ. अनिता रणधीर, डॉ. संजय लाटेलवार, डॉ. संतोष देठे, डॉ. वी. के. शंभरकर, डॉ. वी. जी दुधे उपस्थीत होते. दरवर्षी महाविद्यालयाचा हा पुरस्कार दिल्या जाते.