पोलीस अधिकारी,कर्मचारी, होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटलांचे मुख्यमंत्र्यांना साकडे..!

Bhairav Diwase
0
पोलीस अधिकारी,कर्मचारी, होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटलांचे मुख्यमंत्र्यांना साकडे..!


जळगाव:- राज्यातील पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महेंद्र पाटील यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे या मागण्या सोडवण्याचे साकडे घातले आहे.

राज्यातील पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन द्यावे, वेळेत कपात आणि पगारवाढ करावी. पोलिस कर्मचाऱ्यांना इतर शासकीय विभागाप्रमाणे ५ दिवसांचा आठवडा करावा. इतर राज्यांप्रमाणे राज्यातील पोलिस संघटनेला परवानगी द्यावी. पोलिस व होमगार्ड कर्मचाऱ्यांचे प्रश्न

शासनदरबारी मांडण्यासाठी विधान परिषदेत एक राखीव जागा सोडावी, पोलीस व होमगार्ड यांच्या विकासाकरिता पोलिस महामंडळ स्थापन करावे. होमगार्ड यांना कायमस्वरूपी करावे, सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावे, अशा विविध मागण्यांसाठी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. तर या मागण्या २४ जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जानेवारीपासून संपूर्ण त्रस्त परिवारासह आमरण उपोषण तसेच धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही महेंद्र पाटील यांनी दिला

दरम्यान, पोलीस पाल्यांना उच्चशिक्षित व त्यांच्या भविष्याबद्दल निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा सुरु करावी, अशा मागण्यांचे निवेदन ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री व विविध संबंधित अधिकाऱ्यांना महेंद्र पाटील यांनी दिले आहे. या मागण्या २४ जानेवारीपर्यंत मंजूर न झाल्यास जळगावच्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयसमोर २६ जानेवारीपासून संपूर्ण त्रस्त परिवारातर्फे युवा स्वाभिमान पार्टी जळगांव जिल्हा अध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)