तीन विद्यापीठाच्या स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय ची राधिका दोरखंडे प्रथम

Bhairav Diwase


राजुरा:- राजुरा विदर्भ युनिव्हर्सिटी फिजिक्स टीचर्स असोसिएशन द्वारे   2024 गडचिरोली नागपूर अमरावती आंतरविद्यापीठाद्वारे गडचिरोली येथे आयोजित विद्यार्थ्यांची चर्चासत्र स्पर्धा आणि 
पोस्टर प्रेसेंटेशन कॉम्पिटिशन
विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पोस्टर प्रेझेंटेशन व रिसर्च मॉडेलव्दारे सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये तीन विद्यापीठाचे 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात राधिका दोरखंडे ने प्रथम क्रमांक पटकाविला.

विशेष म्हणजे या स्पर्धेत पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन चे विद्यार्थी होते. या स्पर्धेत द्वितीय, तृतीय बक्षिसे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी पटकावले तर पोस्ट ग्रॅज्युएशन च्या विद्यार्थ्यांना मागे टाकत अंडर ग्रॅज्युएशनची राधिका दोरखंडे हिने प्रथम बक्षीस पटकावून गरुडझेप घेतली. 

तीनही विद्यापीठात मानाचा तुरा लावून आपलं नावलौकिक कमविणाऱ्या राधिका दोरखंडे हिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.  निश्चितच  राधिकाने कमावलेले प्रथम पारितोषिक शिवाजी महाविद्यालय करिताअभिमानास्पद आहे राधिका दोरखंडे हीचे अभिनंदन प्राचार्य डॉ एस एम वरकड, उप प्राचार्य डॉ राजेश खेराणी,डा.विशाल दूधे यांनी केले आहे