सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्..... #Accident #sangali

Bhairav Diwase

पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

सांगली:- पोलीस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कळंबी या ठिकाणी घडली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या या तरुणाच्या मृत्यूने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

शिरीष अमसिद्ध खंबाळे (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. शिरीष हा त्यांच्या मित्रांसमवेत दुचाकीवरून रत्नागिरी-नागपूर मार्गावरील भोसे येथून पोलीस भरती प्रशिक्षणा सरावासाठी सांगलीतील जिल्हा क्रिडा संकुलाकडे सरावासाठी निघाला होता. यावेळी रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकप वाहनाने दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. यामध्ये शिरीष हा जागीच ठार झाला तर त्याचे अन्य तीन मित्र हे गंभीर जखमी झाले.

शिरीषच्या जखमी मित्रांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस भरतीची जिद्द बाळगून हे तरुण सराव करत होते. यापैकी आता एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर तिघांना गंभीरित्या दुखापत झाली आहे. या सर्वांना शासकीय मदत मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन बाईकवरून पहाटेच्या सुमारास दोन दुचाकींवरुन चौघेही भोसे मधून सांगली क्रीडा संकुल येथे येत होते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबीजवळ आले असताना त्यांच्या बाईकला येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये शिरीष अमसिद्ध खंबाळे जागीच ठार झाला तर विश्वजीत विजय मोहिते (वय 24, रा. भोसे) प्रथमेश उत्तम हराळे (वय 24, रा. भोसे), प्रज्वल साळुंखे (वय, 24 रा. कसबे डिग्रज) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील लोकांनी आणि पोलीस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.